(1) गरॊदर पानातील नावनोंदणी म्हणजे काय ?
माता मृत्यू दार आणि बाळ मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने उचलले ते एक पाऊल आहे. त्यानुसार गरोदर स्त्रीने गरोदरपणात कमीतकमी ३वेळा हॉस्पिटलमध्ये दाखविले असणे गरजेचे आहे. पहिल्या ३ महिन्यात एकदा, चौथा ते सह महिन्यात एकदा आणि सात ने नऊ महिन्यात एकदा. गरोदरपणातील सोनोग्राफ असणे आवश्यक आहे. गरोदरपणातील हिमोग्लोबिन, hiv, hbsg, vdrl, bsl, लघवीची तपासणी असणे आवश्यक आहे आणि गरोदरपणातील लसीकरण आवश्यक आहे. अतिजोखीम असेल तेव्हा जास्त वेळा दाखवण्याची गरज असते.
(2) गरोदरपणात किती वेळा डाक्टरांना दाखवणे गरजेचे आहे ?
साधारणपणे १४ आठवड्यापर्यंत दर महिन्याला, १५ ते २८ आठवड्यापर्यंत दर १५ दिवसांनी आणि ३० ते ४२ आठवड्यापर्यंत दर आठवड्याला दाखविणे गरजेचे आहे.
(3) गरोदरपणातील तपासण्या कोणत्या असतात ?
गरोदरपणातील रक्ताच्या तपासण्या पुढीलप्रमाणे
- नावनोंदवताना किंवा पहिल्या वेळी – हिमोग्राम (CBC), बीटा थॅलॅसीमिया, थायरॉईड, एच आय व्ही, एच बी एस जी, व्ही डी आर एल, बी एस एल, ब्लड ग्रुप.
- जी टी टी किंवा तत्सम – २८ आठवड्यानंतर, गरोदर पानातील डायबिटीस आहे का हे बघण्यासाठी
- वारंवार लागणारी – हिमोग्लोबिन आणि युरीन प्रोटीन- दर दोन महिन्यांनी
- गरजेप्रमाणे – लिव्हर टेस्ट, किडनी टेस्ट, रक्त गोठण्याच्या तपासण्या,
(4) गरोदरपणातील जेनेटिक टेस्ट कोणत्या ?
नवनवीन संशोधनामुळे काही जेनेटिक आजार गर्भावस्थेत निदान करणे शक्य आहे. डाऊन सिंड्रोम, पटायु सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम हे आजार जेनेटिक टेस्ट मुले शक्य झाले आहे. त्यासाठी डबल मार्कर, ट्रिपल मार्कर, क्वॅड्रपल टेस्ट, एन आय पी टी, ऍम्नीऑसेन्टेसिस, कोरीओनिक बायोप्सी या टेस्ट करतात.
(5) जेनेटिक टेस्टमुळे बाळाची बुद्धिमत्ता किंवा मेंदूची तपासणी होते का?
हा एक गैरसमज आहे. अजून कोणत्याही टेस्टने बाळाची बुद्धिमत्ता किंवा मेंदूची तपासणी करता येत नाही. ह्या जेनेटिक टेस्ट मुले फक्त डाऊन सिंड्रोम, पटायु सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम हे आजारयाविषयी माहिती मिळते.
(6) अतिजोखमीचे गर्भारपण म्हणजे काय?
जर गरोदरपणात अति रक्तदाब, डायबिटीस, थायरॉईड, झटके येणे, दमा अथवा इतर आजार असतील तर आपण अतिजोखमीचे गर्भारपण high risk pregnancy म्हणतो.
(1) PCOD म्हणजे काय? (What is PCOD)
Polycystic Ovarian Diseases म्हणजे स्त्री बीजांडांना सूज, अनियमित पाळी आणि हार्मोनमध्ये बदल ह्या तिन्ही गोष्टी एकत्र. आणि Polycystic Ovary (पोलीसायस्टिक ओवरी) म्हणजे स्त्री बीजांडांना सूज- कारण ह्यामध्ये अनेक रिकाम्या गाठी असतात ज्यापासून बीज निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे बीजांडाचा आकार वाढलेला असतो.
(2) pcod हा आजार आहे का? (Is PCOD is a diseases?)
PCOD हा काही आजार नाही परंतु त्यामुळे होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे पाळी वेळेवर न येणे, तोंडावर लव येणे, शरीरावर पुरुषाप्रमाणे केस असणे, लवकर दिवस न राहणे, अंगावर अति रक्तस्त्राव होणे, लवकर डायबिटीस होणे अश्याप्रकारे व्याधी उध्दभवू शकतात, सगळ्यांनाच नाही.
(3) PCOD कोणत्या वयात होतो? (Age Group for PCOD)
PCOD पाळी सुरु झाल्यापासून ते पाळी जाऊपर्यंत कधीही उध्दभवू शकतो. तो ज्यावेळी उध्दभवतो त्यावयाप्रमाणे त्याची लक्षणे दिसतात. उदा. वयात येताना पिंपल्सचा जास्त त्रास, अनियमित पाळी , लग्नाअगोदर पाळीत अति कमी किंवा अतिजास्त रक्तस्त्राव होणे, लग्नानंतर दिवस न राहणे, वारंवार गर्भपात होणे, चाळीशीनंतर पाळीचा त्रास किंवा डायबिटीस होणे, असे.
(4) PCOD ची करणे कोणती? (Causes of PCOD)
PCOD काही
- अंशी अनुवांशिक असतो, म्हणजे आई किंवा बहिणीला थोड्याफार प्रमाणात असू शकतो,
- तसेच अतिजाडी
- बदलली लाईफ स्टाईल कोल्डड्रींक्स, बर्गर, पिझ्झा, तळलेले पदार्थ अशा पदार्थाचे अतिसेवन
- काहींची शरीररचना तशी असणे
- आणि कमीजास्त प्रमाणात वरील सर्व कारणे एकत्र असणे.
(5) PCOD च्या तपासण्या कोणत्या? PCOD investigations
- सोनोग्राफी Sonography
- हार्मोन तपासणी Harmones
- BMI – उंची आणि वजन तपासून बीएमआय काढतात.
- इन्शुलिन आणि शुगर तपासणी
(6) PCOD वर उपचार कोणते? PCOD treatment
PCOD हा काही आजार नसल्यामुळे त्यावर एकच असा उपचार नाही. कोणाला किती त्रास होतो आणि कोणाची काय अपेक्षा आहे त्यानुसार उपचार बदलतो .
पण सर्व सामान्यपणे, सर्वांसाठी नियमित व्यायाम, वजन वाढू न देणे, जास्त पिष्टमय पदार्थ न खाणे, सूर्यनमस्कार आणि योगासने करणे ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. असे उपाय आहेत.
प्रस्थावना
आजकाल वैद्यकीय गर्भपात Medical Termination of Pregnancy(MTP) करण्यासाठी बरेचस्या मुली, बायका आणि जोडपी येतात. बरेचसे अनीभिज्ञ, नवखे, घाबरलेले असतात आणि काही आपला हक्क असल्यासारखे येतात. त्यांची करणे सुद्धा खूप असतात. मी खूप वीक आहे, आत्ताच आम्हाला नको आहे, आम्ही अफोर्ड करू शकत नाही, आत्ताच आमचे लग्न झाले आहे पासून आमचे अजून लग्न झाले नाही इथपर्यंत.
तर दुसरीकडे डॉक्टरांना भिती असते कि हा गर्भपात कायद्यामद्धे बसतो का नाही, समोर बसलेले जोडप आम्हाला फसवत तर नाही ना आणि आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा तर लागणार नाही.
तरी पुढे जुजबी माहिती दिली आहे. MTP ACT हा क्रिमिनल स्वरूपाचा कायदा असल्यामुळे त्याचे काटेकोरपणे सर्वत्र पालन केले जाते. अधिक माहिती घेण्यासाठी डॉक्टरांची आणि कायदेशीर तज्ञाची माहिती घ्यावी.
वैद्यकीय गर्भपात म्हणजे काय ?
वैद्यकीय गर्भपात म्हणजे नको असलेला गर्भ काढून टाकणे. यामध्ये गर्भ नॉर्मल असतो. यामध्ये गर्भपिशवीत खराब झालेल्या अथवा मृत झालेल्या गर्भाचा समावेश होत नाही.
वैद्यकीय गर्भपाताविषयी भारतात काय तरतुदी आहेत?
वैद्यकीय गर्भपात हि कायदेशीर बाब आहे. भारतामध्ये गर्भपात कायदेशीर रित्या मान्य आहे. भारत सरकारच्या MTP ACT १९७१ आणि सुधारणा २००२ याखाली याची अंमलबजावणी होते. त्यामध्ये पुढील बाबींचा विचार होतो.
- २० आठवड्यापर्यंतच्या गर्भाचाच वैद्यकीय गर्भपात होऊ शकतो, त्यानंतरच्या गर्भाचा नाही.
- १२ आठवड्यापर्यंत वैद्यकीय गर्भपातासाठी एका अधिकृत डॉक्टराचा सल्ला व सही लागते आणि त्यानंतरच्या म्हणजे २०आठवड्यापर्यंत वैद्यकीय गर्भपातासाठी २ अधिकृत डॉक्टरांचा सल्ला व सही लागते.
- सरकारने मान्यता दिलेल्या अधिकृत हॉस्पिटल अथवा क्लीनिकमध्येच गर्भपात करता येतो.
- सरकारने मान्यता दिलेल्या अधिकृत डाक्टरांनाच गर्भपात करता येतो.
- गर्भपात हा विशिष्ट कारणांसाठीच करता येतो, ते कारणे पुढीलप्रमाणे
वैद्यकीय गर्भपात कोणत्या कारणासाठी करता येतो?
- जर गर्भवती मातेच्या जीवाला धोका असल्यास किंवा गर्भवती मातेला मानसिक किंवा शारिरीक आरोग्यास गंभीर इजा, दुखापत होत असल्यास गर्भपात करता येतो.
- जर नवजात बालकास जन्मानंतर मानसिक किंवा शारिरीक व्यंग असल्यास त्यामुळे बालकास अपंगत्व येणार असेल तर गर्भपात करता येतो.
- जर महिलेला/कुमारीकेला बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असेल, गर्भपात करता येतो (महिलेच्या मानसिक आरोग्याला जबर धक्का बसल्याचे गृहित धरुन)
-
विवाहितमहिलेकडून किंवा तिच्या पतीकडून गर्भनिरोधक सा/औषधाच्या निष्क्रियतेमुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करता येतो.
- संमतीपत्र Consent१८ वर्षावरील स्त्रीला तिच्या स्वतःच्या सहीने गर्भपात करता येतो. १८ वर्षाखालील तसेच मतिमंद/ मानसिकरोगी स्त्री साठी तिच्या पालकांनी सही करावी लागते.
- अविवाहित स्त्रीअविवाहित स्त्रीला गर्भपात करता येतो.
- १८ वर्षापुढील स्त्रीला समतीपत्रावर Consent सही करता येते तसेच तिला कोणाविरुद्ध पोलिसात तक्रार नसल्याचे हमीपत्र द्यावे लागते.
- १८ वर्षाखाली मुलीला तिच्याबरोबर तिच्या पालकांची सही लागते आणि हि केस मेडिको लीगल असल्याने त्याची पोलिसांना खबर द्यावी लागते. तसेच तिचा जबाब नोंदवावा लागतो. त्यामुळे १८ वर्षाखालील मुलीचा गर्भपात हा सर्व बाबीची पूर्तता करून शक्यतो सरकारी दवाखान्यात केला जातो.
- गोपनीयता गोपनीयता हा या MTP Act चा भाग आहे. मॅजिस्ट्रेटच्या किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय पेशंट विषयी माहिती कोणालाही दिली जात नाही.
वैद्यकीय गर्भपात कसा करतात?
गर्भ किती दिवसाचा आहे त्यानुसार गर्भपात कसा करावा ही ठरते. शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजून गर्भ किती दिवसाचा आहे ते मोजतात. परंतु सोनोग्राफीचा रिपोर्ट अंतिम मानला जातो.
गर्भ जर 7 ते कधी कधी 9 आठवड्यापर्यंतअसेल 49 ते 63 दिवसापर्यंत तर गर्भपाताच्या गोळ्या घेऊन गर्भपात करता येतो. 90-95% केसेमद्धे तो पूर्ण होतो. अर्धवट झाला असल्यास पिशवी साफ करणेची शस्त्रक्रिया करावी लागते.
गर्भ 7-12 आठवड्याचा असेल तर एकदम पिशवी साफ करणेची शस्त्रक्रिया करून सुध्या गर्भपात करता येतो.
14-20 आठवड्यापर्यंत डिलव्हरी करून गर्भपात करावा लागतो. अंतिम निर्णय तज्ञ डॉक्टर घेत असतात.
आज जगात कोरोंनाने थैमान मांडले आहे. कोरोंना हा गरोदर स्त्रियाना सुद्धा होऊ शकतो. त्याविषयी आपण जाणून घेऊ आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते ते पाहू.